नमस्कार, मी शार्दूल. योग्य जोडीदार भेटावा या साठी खरंच खूप धावपळ झाली आणि ऑनलाईन पाहावं तर अवाजवी खर्च नात्यात आणि ओळखीतून असणारी जवळ जवळ सर्व स्थळे पाहून झालीत आता काय करावं अशा अडचणीत असताना लग्नाठरले.कॉम ची जाहिरात दिसली फार च budget friendly फी असल्यामुळे मी लगेच १ वर्षाची मेम्बरशिप घेतली आणि इथेच रजिस्टर असेलेल्या माझा life पार्टनर ची भेट झाली.
A Heartiest Thanks To all the Lagnatharle.com team for helping me to find my suitable partner, Keep it up🤟🏻 more power to you 👍🏻
नमस्कार, मी अर्जुन सहाणे. मी लग्नासाठी फार दिवसांपासून स्थळ पाहत होतो. lagnatharle.com वर मेम्बरशिप घेताना मला काही फारशी खात्री नव्हती. पण इथूनच माझी जोडीदार मला मिळाली. फारच user-friendly website आहे. आम्ही दोघे अगदी securely आणि easily कनेक्ट झालो. सुसंवाद झाला आणि लग्न करून आज सुखी आहोत, आम्हा दोघां कडून मनापासून लग्नठरले टीम चे खूप खूप धन्यवाद.
नमस्कार मी कमलेश, आधी एका वेबसाईट वर माझी फसवणूक झाली होती पैसे भरण्यासाठी खूप कॉल आले पण मेंम्बरशिप घेतल्यावर कोणीहि कॉल उचलत नव्हतं. त्यात काही दिवसांनी lagnatharle.com मधून नम्रता मॅडम चा कॉल आला आणि मॅडमचा म्हणण्यावर मी पैसे भरले. बऱ्याच शोधमोहीमे नंतर का असेना पण lagnatharle.com वरून आम्ही दोघे भेटलो आणि लग्नही जुळलं.
मी आजवर वापरलेली ही सर्वोत्तम वैवाहिक वेबसाइट आहे. माझे लग्न याच प्लॅटफॉर्म वरून जुळले. या प्लॅटफॉर्मवर बरेच प्रस्ताव उपलब्ध आहेत. सर्वात कमी शुल्कासह, ते खूप चांगली सेवा देत आहेत तसेच वापरण्यासही सोपे आहे.
--नितीन गवळे
विनोद साठी एक योग्य आणि परिपूर्ण स्थळ शोधण्यासाठीचा आमचा अनुभव खूपच सोयीस्कर होता. lagnatharle.com वर नाव नोंदवल्यावर ३ महिन्यांतच आम्हाला मनासारखी सून मिळाली. शिंदे कुटुंबासाठी तर पहिल्याच प्रोफाइल मध्ये त्यांनी विनोदचे स्थळ सुनिश्चित केले. म्हणून आम्ही कदम व शिंदे कुटुंबातर्फे lagnatharle.com चे आभार मानतो.
-- श्री. दिलीप कदम (विनोदचे वडील)
लग्न हे दोन आत्म्यांप्रमाणेच दोन कुटुंबांमधले आयुष्यभराचे बंधन असते. मी अशा जोडीदाराच्या शोधात होतो जो मला समजून घेईल आणि सर्व अडचणींमध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि लग्नठरले.कॉम च्या समर्पित टीम आणि सततच्या प्रयत्नांमुळे मला अखेर जागृतीच्या रूपाने माझा परिपूर्ण जीवनसाथी मिळाला आहे.
-- श्रीधर
आपण प्रेम करत असलेल्या व्यक्तीशी जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा आनंदी वैवाहिक जीवनास सुरुवात होते. परंतु आपण लग्न केलेल्या व्यक्तीशी जेव्हा आपणास प्रेम होते तेव्हा आपले वैवाहिक जीवन हे खऱ्या अर्थाने फुलते. मार्च 2018 मध्ये आमचे लग्न झाले आणि आज आम्ही एक आदर्श जोडी म्हणून पुढे एका अद्भुत प्रवासाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करीत आहोत. आमची भेट घडवून आणल्याबद्दल आम्ही लग्नठरले.कॉम चे मनापासून आभारी आहोत.
श्रीकांत आणि राजश्री